नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नामुळे सहा महिने रखडलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली...
पनवेल दि.३० (वार्ताहर)- महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील आनंद नगर येथील जवळपास सहा महिने रखडलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला आहे.
        आनंद नगर येथील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज लाईनेचे चेंबर गेल्या काही महिन्यांपासुन सतत वाहत होते ते घाण पाणी रोडवर येऊन याच पाण्यातुन  येथील नागरिकांना व रहिवाशांना ये-जा करावे लागत होते व त्याच पाण्यातुन  वाहने जाऊन ते घाण पाणी लोकांच्या अंगावर उडुन येथे अनेक वेळा वाद निर्माण होत होते हे   स्थानिक नगरसेवक नगरसेवक राजु सोनी यांच्या निदर्शनास आले त्यांनी लगेच हे काम आपल्या स्व खर्चाने करून घेणे असे त्यांच्या स्वीय सहायक मंदार देसाई यांना सांगितले त्यांनी हे काम तातडीने सुरू करून व त्या ठिकाणी २ मोठे पाईप सुद्धा टाकण्यात आले त्यांनी ते काम लगेचच करून घेतले त्यामुळे येथील रहिवाशांनी राजु सोनी व मंदार देसाई यांचे मनापासुन आभार मानले. तसेच लाईन आळी येथे नुकताच झालेल्या पावसामुळे रस्त्यांना पडलेले खड्डेही भरून घेतले आहेत.
       

फोटो- ड्रेनेजचे काम व रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून घेतानाComments