शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केला कोविड योद्ध्यांचा सन्मान...

पनवेल : वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवराज प्रकल्पगस्त सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोविड काळामध्ये अविरतपणे जीव धोक्यात घालून जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता दूत यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पनवेल तालुक्यातील वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात सेवा बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांना देवदूत या नावाने यापूर्वीच संबोधले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या अशा देवदूतांचा सन्मान येथील शिवसैनिकांनी केला. यावेळी डॉ. राज चव्हाण, डॉ नितीन तांदळे, आरोग्य सेवक धनाजी जाधव, सुनिता नळावडे, योगिता गुरव, दत्तात्रेय चोरघे, सुनिता थळे, आश्लेषा भगत, अनुराधा झडे, अशोक पालकर, संजिता म्हात्रे, भारत म्हशीलकर व त्यांच्या सर्वं सहकाऱ्यांचा सत्कार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सोबत उपतालुकाप्रमुख शांताराम कुभारकर, विभाग प्रमुख प्रमोद पाटील, दत्ता फडके, उपविभागप्रमुख विष्णू भोईर, विलास पाटील, नंदू म्हात्रे, भारती पेटकर, विश्वास पेटकर, तुळशीराम मुकादम, एकनाथ पाटील, जनार्धन भोईर, युवासेना पदाधिकारी मनोज कुंभारकर, जीवन पाटील, दिनेश भोईर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image