सोन्याचा राणीहार केला लंपास...
पनवेल, दि.१८ (संजय कदम)- एका महिलेच्या पिशवीतून सोन्याचा राणीहार कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शहरातील झवेरी बाजार परिसरात घडली आहे.
कुसूम फडके (वय-48) यांच्याकडे असलेल्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी 22 ग्रॅम वजनाचा जवळपास 66 हजारांचा सोन्याचा राणीहार चोरून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.