पनवेल मध्ये टाटा मोटर्सची सेवा सुरू ; टाटा मोटर्सचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांच्याहस्ते उदघाटन..


पनवेल वैभव/ प्रतिनिधी :-  मुंबई प्रायवेट लिमिटेड यांचे नवीन शोरूम आज दिनांक १३ जुलै रोजी पनवेल येथे सुरु करण्यात आले आहे. या शोरूम चे उदघाटन टाटा मोटर्सचे अध्यक्ष शैलेशचंद्रा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 
 
पनवेलमध्ये नव्याने सुरु झालेल्या टाटा मोटर्स या नवीन शोरुमचे उदघाटन टाटा मोटर्सचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांच्या हस्ते आज (मंगळवार, दि. १३) झाले. पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये असलेल्या हेरिटेज मोटर्समध्ये टाटा मोटर्सचे नविन शोरूम  उभारण्यात आले आहे. या शोरूममध्ये टाटा कंपनीच्या सर्व प्रकारची वाहने उपलब्ध करून देण्याबरोबरच योग्य सेवा देण्याची हमी या सेंटरने दिली आहे. 

या उदघाटन सोहळ्यास नॅशनल हेड दोरायराजन, हेरिटेज टाटा मोटर्स चे एमडी सुरेंद्र उपाध्याय, झोनल मॅनेजर रवी मिश्रा, विभागीय व्यवस्थापक मनिष अगरवाल, आशिष खंदारे, विरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन रावराणे, प्रविण उपाध्याय, राहुल सुर्यवंशी, देव मिश्रा , दुर्गा प्रसाद आदी मान्यवरांसह ग्राहक उपस्थित होते. यावेळी नव्याने वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांना शैलेश चंद्रा यांच्या हस्ते वाहनांची चावी सुपूर्द करण्यात आली.
Comments