मा.उपमहापौर,भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा....

पनवेल / प्रतिनिधी :-  " माझा प्रभाग माझी जबाबदारी" या अनुषंगाने काम करणारे व प्रभागाला आपले कुटुंब व नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांचा वाढदिवस यंदाही प्रभागात सामाजिक उपक्रम व विकास कामे यांच्या उद्घाटनाने साजरा झाला.
नागरिकांचे आरोग्य चांगलं आणि उत्तम रहावे या करीता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त १३-१७ जुलै  मोफत होमिओपॅथी आरोग्य चिकित्सा शिबिर व मोफत औषधे वाटप आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती यावेळी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्व नागरिकांना केली आहे.या शिबीरा सोबत पर्यावरणाचे महत्त्व आणि जागरूकता लोकांच्या मध्ये व्हावी या हेतूने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मोफत रोप वाटप ही करण्यात आले.प्रभागातील कामांच्या बाबत नेहमी तत्पर असणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी वाढदिवसानिमित्त नगरसेवक निधीतून स्ट्रीट लाईट पोलचे लोकार्पण करण्यात आले. विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता प्रामुख्याने पनवेल महानगरपालिका महापौर कविता चोतमल, सभागृह नेते श्री परेश ठाकुर,भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्राचे सरचिटणीस राहुलजी लोणीकर, सुशीलजी मेंगडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुपजी मोरे, निखिल चव्हाण, योगेशजी माईंद. युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम, समीर कदम आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याच बरोबर प्रभागातील जेष्ठ नागरिक आणि नागरिक आपल्या लाडक्या विक्रांत दादांना शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्याकरिता उपस्थित होते. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार मानले.




Comments