मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची तत्परता ; रस्त्यावरील पडलेल्या डेब्रिजची त्वरित साफ-सफाई.

पनवेल/ प्रतिनिधी :- प्रभाग  क्र १८ मधील विकास कामांच्या माध्यमातून सध्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि कलवट बांधण्याचे सुरू आहे.लोखंडी पाडा समोरील कलवट बांधण्याच्या वेळी जुने पाईप आणि माती काढण्यात आली होती.काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यावरील पाईप आणि माती काढण्यात आली नव्हती,त्यामुळे रहदारीस त्रास होत होता आणि लोखंडी पाड्यातील नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता कलवटच्या बाजूने असल्याने त्यांनाही त्रास होत होता.ही बाब लोखंडी पाड्यातील जागरूक नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी काँट्रॅक्टरला बोलवून त्वरित साफसफाई करून घेतली. लोखंडी पाडा आणि अशोक नगर मधील नागरिकांच्या समस्या नगरसेवक विक्रांत पाटील तत्परतने सोडवतात याबद्दल रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments