पनवेल मधील स्वराज संजय सोनावणे व विरेन ठाणगे यांनी मिळविले परदेशात दैदिप्यमान यश...
पनवेल दि.१० (संजय कदम)- पनवेल मधील कु. स्वराज संजय सोनावणे व विरेन ठाणगे यांनी परदेशात दैदिप्यमान यश मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.           

पनवेल येथे वास्तव्यास असलेले कु. स्वराज संजय सोनावणे, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, जेएमडी एस.आर.एस ग्रुप, सहसंपादक दैनिक रायगड लोकशक्ती यांनी लंडन साऊथ बँक युनिव्हर्सिटी मधून बॅचलर ऑफ आर्ट्स (बिझिनेस मॅनेजमेंट) हि पदवी संपादन करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच कु. विरेन विजय ठाणगे, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे उपाध्यक्ष कोअर कमिटी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्टर मधून बॅचलर ऑफ आर्ट्स, बिझिनेस मॅनेजमेंट (फायनान्स) हि पदवी संपादन करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल या दोघांचा लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. 

यावेळी सदर कार्यक्रमास डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे, राष्ट्रीय अध्यक्ष, निलेश सोनावणे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष (प्रशासन), सौ. संजीवनी शिर्के, राष्ट्रीय मुख्य संयोजक, ॲड. मनोज म्हात्रे, राष्ट्रीय महासचिव, डाॅ.राजेश साखरे, अध्यक्ष कोअर कमिटी., सचिन कांबळे, सरचिटणीस कोअर कमिटी., नितीन जोशी, राज्य कार्याध्यक्ष, ॲड. अरूण कुमार, बिहार राज्याध्यक्ष, शरद सोनावणे, राज्य उपाध्यक्ष (प्रशासन), गौतम खिल्लारे, राज्य सचिव अनु.जाती जमाती विभाग, प्रदिप सोनावणे, अध्यक्ष नवी मुंबई, मयुर सोनावणे, युवा अध्यक्ष रायगड, कु. प्रथमेश सोनावणे, युवा जिल्हाध्यक्ष नवी मुंबई, कु. रूपम सोनावणे,युवा सचिव, नवी मुंबई, सुनिल वाघपंजे,अध्यक्ष पनवेल उपविभाग, कु. सुशिल तांबे, अध्यक्ष रोहा उपविभाग, श्रीमती शोभा सोनकांबळे स्वीय सहायक, ॲड.ज्योती सरोदे, सौ. पुर्वा सोनावणे, रूद्रवली महिला आघाडी., सौ. रत्ना भूनेसर, सहायक., सनिप कलोते, अध्यक्ष क्षितिजपर्व फाऊंडेशन पनवेल सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.          
Comments