पनवेल दि.22 (वार्ताहर)- फेसबुक सारख्या आभासी दुनियेच्या माध्यमातून 2800 पेक्षा जास्त असलेल्या व विविध ठिकाणी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या सर्वांपैकी काही जणांनी एकत्र येऊन पनवेलमध्ये स्पेशल 40च्या सदस्यांनी गेट टू गेदर केला.
स्पेशल 40 या ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना सकपाळ आणि शिल्पा मेनन असून या ग्रुपचा प्रथम गेट टू गेदर पनवेल येथील कर्नाळा याठिकाणी ग्रुपच्या मॉ़डरेटर अपूर्वा प्रभू यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून यशस्वीरित्या पार पाडला.
आयुष्याच्या धकाधकीत दोन क्षण आनंदाने घालविण्याच्या उद्देशाने पनवेलसह मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, उस्मानाबाद या ठिकाणाहून हौशी 40 सभासद उपस्थित होते. आपले आचार विचार, व्यवसाय उद्योगधंदे या संदर्भात चर्चा केली व दिवस व्यतीत केला व आगामी काळातही असा तऱ्हेने पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निश्चय करून निरोप घेतला.