भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश;उच्च तंत्र शिक्षण मंत्री राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार ......

पनवेल / वार्ताहर : -  राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे  लाऊन धरली होती. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता.याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता भाजयुमो प्रदेश अध्यक्ष  विक्रांत पाटील यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल महोदयांचीही भेट घेऊन मागणी केली होती. 

नागपूर विद्यापीठातही संघर्षाची भूमिका घेत भाजयुमो ने यशस्वी आंदोलन करत सदर शुल्कात सूट मिळवून घेतली होती.त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अशी शुल्क कपात करावी अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

 "देर आये-दुरुस्त आये", भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा निर्णय करणार असल्याबद्दल भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शिक्षण मंत्री यांचे आभार मानले आहेत. 

तसेच अजून महत्वाच्या दोन मागण्या प्रलंबित असून, सन २०२०-२१ साठीही हा निर्णय लागू करावा, आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा या मुख्य मागण्यांवर ही त्वरित सकारात्मक निर्णय करावा अशी मागणी भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image