वकिल महिलांनी एकत्र येऊन केले वृक्षारोपण....
वकिल महिलांनी एकत्र येऊन केले वृक्षारोपण.....
पनवेल दि. २८ (वार्ताहर): पनवेल मधील वकील महिला एकत्र येऊन गाढी नदी पनवेल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा  सर्वांना परिचय करून  दिला.         महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमात महिला वकील सहभागी झाल्या होत्या. 
यामध्ये ऍड. मनीषा गायकर, अस्मिता भुवड, वर्षा हजारे, मनीषा गावंड, जान्हवी वाडकर, पौर्णिमा सुतार, ज्योती ऊरणकर, जयश्री दाभोळकर, अश्विनी पाटील, प्रगती ठाकूर, मनीषा वैदु, कामिला बेग तसेच आरती चाळके व प्रियंका राऊत यांचा सहभाग होता.
 यावेळेस निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष मंदार कर्वे, अरविंद गोडबोले, धनंजय पाटील, रोहित पाटील, सौ व श्री कानिटकर व श्री शिवप्रसाद निकम हजर होते. भर पावसामध्ये अतिशय उत्साहात व आनंदाच्या वातावरणात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
       


फोटोः वकील महिला वृक्षारोपण करताना
Comments