सुकापूर ते नेरे परिसरात वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी....
पनवेल दि. २७ (वार्ताहर): भगतवाडी- सुकापूर ते नेरे परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव यांनी केली आहे.
     पनवेल तालुक्यातील सुकापूर, आकुर्ली, नेरे, मोरबे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. भरमसाट वाढलेल्या लोकवस्तीमुळे वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना मनस्तप सहन करावा लागतो. त्यातच सुकापूर पासून रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर रिक्षा पार्किंग, हातगाड्या, अनधिकृत व्यवसाय केले जात असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताला आमंत्रण मिळते. येथील रस्त्यांवर रोज छोटे मोठे अपघात घडत असतात. रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेकदा प्रवासी किंवा वाहन चालकांना खाली उतरावे लागते. त्यामुळे वेळ आणि इंधन वाया जाते. या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमल्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नसल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी व्यक्त केले आहे. 
          
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image