पनवेल वैभव / वार्ताहर :- ठाणा नाका रोड ते आशियाना सोसायटी या काँक्रीट रस्त्यावरील रहदारी जास्त असल्याकारणाने काही ठिकाणी ड्रेनेज ची झाकणं तुटली होती. याविषयी माहिती प्रभागातील जागरूक नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली.या रस्त्यावरील रहदारी लक्षात घेता आणि काही दुर्घटना होऊ नये यासाठी तत्परतेने महानगर पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतः जातीने उभे राहून ड्रेनेज ची झाकणं बदलून घेतले. नगरसेवक विक्रांत पाटील प्रभागातील समस्या स्वतः जातीने लक्ष घालून सोडवतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने तूटलेली ड्रेनेजची झाकणे त्वरीत बदलली.....
• Anil Kurghode