कार्यतत्पर नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांच्या वतीने स्वखर्चाने नागरिकांचे लसीकरण.....


पनवेल / प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे मार्गदर्शक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून स्वखर्चाने ३५० नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. 

सदर लसीकरण नवीन पनवेल येथील भुजबळ वाडीतील पनवेल महानगरपालिका शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी नवीन पनवेल येथील यशोधन सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भागीरथी सोसायटी या तीनही सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबियांचेही लसीकरण करण्यात आले.

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत महत्वाचे आहे. असे असतानाही अनेकजण अजूनही लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. १८ ते ४४ या वयोगटातील अनेक नागरिकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. अशावेळी सर्वांचे लसीकरण व्हावे या भावनेतून सदरचे लसीकरण  आयोजित केले असल्याचे अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, सर्वप्रथम २५० लसी खरेदी करण्याचे ठरवले होते. परंतु त्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या नातेवाईकांचेही लसीकरण करण्याचा विचार मनात आला. पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटलकडून लसी खरेदी करण्यात आल्या असून १८ ते ४४ वयोगटातील ३५० नागरिकांचे लसीकरण लाईफलाईन हॉस्पिटलच्या टीमने केले. 

प्रभागातील नागरिकांबरोबरच पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनीही या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. काही ठिकाणी पत्रकारांसाठी यापूर्वी लसीकरण मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पत्रकारांच्या कुटुंबियांना लसीकरणाचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्‍वभूमीवर पनवेलमधील पत्रकार संघटनांशी मनोज भुजबळ यांनी संपर्क साधून पत्रकारांच्या कुटुंबातील साधारण ५० व्यक्तींचे लसीकरण करण्याबाबत आवाहन केले होते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सदरची लसीकरण मोहीम आयोजित केली असल्याचे अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी सांगितले.

या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पनवेल शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनीही अ‍ॅड.मनोज भुजबळ यांचे आभार मानले. सदर लसीकरण मोहिमेसाठी उत्कर्ष मित्र मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image