शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा...
पनवेल, दि.१० (संजय कदम) ः शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांनी आपला वाढदिवस कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा न करता पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना रेनकोट वाटप करून त्याचे अजिवली येथील वैद्यकीय केंद्रात आवश्यक ती वैद्यकीय मदत देवून साजरा केला.
शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील हे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपकम राबवून आपला वाढदिवस साजरा करीत असतात. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी 24 तास रस्त्यावर असणार्‍या पोलीस बांधवांना यंदाच्या पावसाळ्यात रेनकोट ही आगळी वेगळी भेट द्यावी अशी कल्पना त्यांच्या मनात आली व त्यांनी ती जिल्हाप्रमुख मा.आ.मनोहरशेठ भोईर यांना सांगितली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर व पो.नि.खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना रेनकोटचे वाटप केले. तसेच त्यांनी अजिवली येथे जावून वैद्यकीय मदत केली आहे. यावेळी मा.आ.जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, युवा सेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, उपतालुकाप्रमुख विष्णु लहाने, उपतालुका संघटक सुधीर पाटील, पनवेल युवा सेना अधिकारी पराग मोहिते, समाजसेवक महेंद्र गायकर, आनंद पाटील, प्रणेय लबडे, विनोद पाटील, नितीन पाटील, संजय पाटील, निलेश बाबरे, शाखाप्रमुख बबन पाटील, संतोष पाटील, अनिकेत पाटील, सुदर्शन मते, अरुण पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कोट
पोलीस बांधव हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांसाठी झटत असतात. अशा बांधवांना एक मदत म्हणून रघुनाथ पाटील यांनी एक चांगला उपक्रम राबविला आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये अजिवली येथील आरोग्य केेंद्राला महत्वाची मदत त्यांच्यामार्फत देण्यात येते. शिवसैनिक हा नेहमीच समाजासाठी कार्यरत असतो. हे आजच्या उपक्रमातून दिसून येत आहे.


फोटो ः पोलीस बांधवांना रेनकोटचे वाटप करताना मा.आ.जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, वपोनि रवींद्र दौंडकर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील व इतर अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image