ग्राम संवर्धनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ....
पनवेल /  दि. २१ जून २०२१ : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र ( रायगड ) आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने बांधनवाडी येथे सोमवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. नेहरू युवा केंद्राचे रायगड जिल्हा समन्वयक निशांत रौतेला यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून ग्राम संवर्धन संस्थेचे कार्यालय बांधनवाडी येथे योग दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी तेजस चव्हाण, सुनील विश्वकर्मा, गोलू गुप्ता, रमेश महर, साहिल साहू यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments