स्कूटी मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये देशी दारूचा साठा.....


पनवेल दि.25 (वार्ताहर)- स्कूटी मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा केल्याप्रकऱणी सदर आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले आहे.
        कुंदन सिंग (वय-36, रा.-कसळखंड) याने नवकार लॉजिस्टीक कंपनीच्या गेटच्या बाजूस त्याच्याजवळील स्कूटी मोटारसायकलमध्ये असलेल्याडिक्कीमध्येदेशी दारूच्या काही बॉटल असल्याची माहिती वपोनि रविंद्र दौंडकर यांनी मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक विजय खेडकर, पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार व पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून देशी दारूच्या बाटल्यांसह मोटारसायकल असा मिळून 31, 950 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments