गुन्हेशाखा कक्ष-२, पनवेलने केला दारूसाठा हस्तगत.....
गुन्हेशाखा कक्ष-२, पनवेलने केला दारूसाठा हस्तगत....

पनवेल दि. २३ (संजय कदम): पनवेल शहराजवळील मालधक्का झोपडपट्टी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातगुन्हेशाखा कक्ष-2चे वपोनि गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.          मालधक्काझोपडपट्टी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्यसाठा जवळ बाळगून असल्याची खबर वपोनि गिरीधर गोरे यांना मिळताच यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पवार, पोलिस हवालदार प्रशांत काटकर, सहाय्यक फौजदार सुनिल साळुंखे, पोना इंद्रजित कानू, प्रफुल्ल मोरे, दिपक डोंगरे, सचिन म्हात्रे आदींच्या पथकाने छापा टाकून त्याठिकाणी असलेला आरोपी संजय मल्हारी बघाटे (वय-34) याला ताब्यात घेऊन जवळ बाळगलेला 5 हजार 305 रूपयांचादेशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
Comments