कपाटातील रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी
पनवेल : दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली आहे. खारघर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीआयएसएफ येथे निरीक्षक पदावर काम करणारे अविनाश अमर हे खारघर सेक्टर 35 डी येथे राहतात. ते मुंबई येथे कामासाठी गेले होते. कामावरून परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या दरवाज्याचा लॉक तूटलेला दिसला. यावेळी चोरट्यांनी 35 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल आणि पाच हजार रुपये चोरून नेले.