कळंबोली गावातील पाण्याच्या टाकीवरील बुस्टर पंप नव्याने बसविण्याच्या मागणीला नगरसेवक रविंद्र भगत यांना यश....

पनवेल दि.09 (वार्ताहर)- कळंबोली गावातील असलेल्या टाकीवरीलबुस्टर पंप नव्याने बसविण्यासाठीमागणीनगरसेवक रविंद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला यश येऊन आता सदर ठिकाणी नव्याने बुस्टर पंप बसविण्यास सुरवात झाली आहे.
        या संदर्भातनगरसेवक रविंद्र भगत यांनीकळंबोली गावात नागरिकांना पाण्याची तीव्र समस्या भेडसावत असल्याने तेथे सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने तेथील पंपहाऊस येथे तातडीने बुस्टर पंप बसविण्यात यावे अशी मागणी केली होती. जुन्या बुस्टरपंपामुळे पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमीतपणे होत होता. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन नव्यानेबुस्टर पंप बसवून दिल्याने कळंबोली गावातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.         


फोटोःनगरसेवक रविंद्र भगतनव्यानेबुस्टर पंप बसवून घेताना
Comments