पोस्कॉ महाराष्ट्र स्टीलद्वारे पावसाळा उपयोगी साहित्य व कोविड-१९ प्रतिबंधक सामानाचे रायगड पोलिसांना वाटप .....

रायगड / जून १८, २०२१ :-  कोविड महामारी दरम्यान नागरिकांना सामाजिक अंतर पाळायला लावणे तसेच घरातच सुरक्षित राहण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम रायगड पोलीस करते आहे.  रायगड पोलिस दिवस  रात्र एक करून कोविड-१९ च्या विरोधातील लढ्यात महत्त्वाचे योगदान  देत आहेत.
पोस्कॉ महाराष्ट्र स्टील यांना रायगड पोलिसांच्या कामाचा आदर आहे व त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी पोस्कोद्वारे  रायगड पोलिसांना बॅरिकेट, स्टँडी फलक, वाहतूक नियंत्रक सुरक्षा दंड, फोल्डएबल खुर्च्या , टॉर्च, रेनकोट, फोल्डेबल मोठया छत्र्या, पाण्याचा बाटल्या, एन-९५ मास्क व सॅनिटायझर इत्यादी वस्तू दान करण्यात आल्या.
रायगड जिल्यातील विले भागड एमआयडीसी परिसरात स्थित असलेल्या पोस्कॉ महाराष्ट्र स्टीलद्वारे उच्च प्रतीच्या स्टीलची (गॅलवनाईज्ड व गॅलवा अनिल्ड)निर्मिती केली जाते ज्याचा वापर सर्व प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात, घरगुती उपकरणे व वाहन उद्योग इत्यादी साठी होतो. 
  रायगड पोलिस कोविड-१९ विरुद्ध देत असलेले योगदानाचा पोस्कॉ महाराष्ट्र स्टील आदर करते व नागरिकांच्या आरोग्याची कामना करते.
Comments