स्माईल फौंडेशन व ब्लू लाईन फौंडेशन यांचे माध्यमातून तालूका पोलिसांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल दि.06 (संजय कदम)- स्माईल फौंडेशन व ब्लू लाईन फौंडेशन यांचे माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.          
यावेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण), पो. आजीवली, ता. पनवेल ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारी मध्ये तेथील आदिवासी लोकांना सध्या रोजगार नाही. त्यामुळे सदर आदिवासी वस्ती वरील एकूण 45 कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके तांदूळ, साखर, डाळ, तेल, कांदे व इतर किराणा असे साहित्यांचे वाटप स्माईल फौंडेशन व ब्लू लाईन फौंडेशन यांचे माध्यमातून पोलीस उप आयुक्त, परि-2, पनवेलचे शिवराज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 
तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फणसवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अशा कठीण प्रसंगी केलेल्या मदतीमुळे तेथील सर्व आदिवासी लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.         

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image