२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी .....
२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी 

पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, यासाठी आता २४ जूनला सिडकोवर किमान ०१ लाख लोकांचा धडक आंदोलन होणार आहे.  त्या अनुषंगाने विभागनिहाय बैठका आणि त्यामध्ये नियोजन करत जोरदार तयारी सुरु आहे. 
          लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका होत आहे. त्या अनुषंगाने गव्हाण, पालीदेवद जिल्हा परिषद आणि पळस्पे, कोन पंचायत समिती विभाग निहाय बैठका संपन्न झाल्या. या बैठकीस भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेठु पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विविध ग्रामपंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
         १० जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. 'निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का' हि प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घालण्यासाठी २४ जून उजाडण्याची वाट पहात आहेत. 

चौकट - 
भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणाची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. २४ जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. आणि या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे.  आणि तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे. 
                 
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image