क्विकहिल कंपनीने पटवर्धन रुग्णालयाला दिली रुग्णवाहिका ......

पनवेल, दि.८ (वार्ताहर) ः क्विकहिल कंपनीने पटवर्धन रुग्णालयाला रुग्णवाहिका देणगी म्हणून दिल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे. 
सदर कार्यक्रमास क्विकहील कंपनीचे चेअरमन मँनेजिंग डायरेक्टर कैलास काटकर, विश्‍वस्त क्विकहील फाउंडेशन सौ.अनुपम काटकर, सी एस आर प्रमुख अजय शिर्के, रा.स्व.संघ जनकल्याण समिती प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक, प्रांत सह कार्यवाह विनायकराव डंबीर, प्रांत कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर, रा.स्व.संघ प.महाराष्ट्र सह कार्यवाह धनंजय घाटे, रा.स्व.संघ कोकण प्रांत सह सेवा प्रमुख शिरीष देशमुख, रा.स्व.संघ जनकल्याण समिती कोकण प्रांत कार्यवाह अविनाश धाट,  उप आयुक्त पनवेल महानगरपालिका - विठ्ठल डाके, सहायक आयुक्त पनवेल महानगरपालिका धैर्यशील जाधव, पटवर्धन रुग्णालय प्रकल्प समिती अध्यक्ष - डॉ. रवींद्र ईनामदार उपाध्यक्षा- डॉ. किर्ती समुद्र, प्रकल्प कार्यवाह राजीव समेळ, कोषाध्यक्षा -सौ.अनुराधा ओगले, रुग्णालय संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पुजन व रुग्णवाहिका  उद्घाटनाने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.अनुराधा ओगले यांनी केले. क्विकहीलचे अजय शिर्के, पनवेल महानगरपालिका उप आयुक्त विठ्ठल डाके, व जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो ः क्विकहिल कंपनीने दिलेली रुग्णवाहिका
Comments