कोपरखेरणे, घणसोली, रबाळे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप....

पनवेल / प्रतिनिधी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अबोली महिला रिक्षा चालक संघटनेच्या महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे असलेली उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत.  यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही तातडीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट या संघटनेच्या महिलांकरीता उपलब्ध करुन दिले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल तर्फे सर्व रिक्षा अबोली चालक महिलांना कोपरखेरणे रेल्वे स्टेशन जवळ धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अबोली रिक्षा महिला चालक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व महिलांना धान्य देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थितत होते  कोपरखेरणे, घणसोली, रबाळे रिक्षा चालक महिलांना जीवनाशक वास्तूंचा वाटप करण्यात आले. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानण्यात आले.
Comments