ऐतिहासिक जागी विद्यार्थ्यांसोबत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा झाला साजरा वाढदिवस ....

पनवेल दि.१४ (वार्ताहर)-  पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रायगड मधील खालापूर तालुक्यातील "चावणी" ह्या वाडीवर शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की ज्या शाळेत हा कार्यक्रम साजरा झाला त्या गावची ग्रामपंचायत गेल्या २५ वर्षपेक्षा जास्त काळ शिवसेनेच्या सोबत आहे अशावेळी तेथील मुलाना जणू आदित्य ठाकरेआपल्याला भेटायला आले आहेत आणि त्यांच्या सोबत आपण केक कापून वाढदिवस साजरा करतोय ही भावना यावी म्हणून ही शाळा निवडली कार्यक्रमासोबत मुलांना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य, खाऊ, फळे, खेळणी व मास्क चे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले. सोबत मुलांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. आयोजन युवासेनेचे मावळ चे विस्तारक राजेश पळसकर, अनिकेत घुले व पदाधिकारी यांच्या माध्यमातून झाले. 

याप्रसंगी युवासेना मावळ, युवासेना रायगड, शिवसेना अवजड वाहतूक सेना रायगड व स्थानिक शिवसेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
Comments