शेकापच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सिडकोने उचलल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या....

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः गेल्या 10 दिवसापासून खांदा कॉलनी आणि परिसरात झाडांच्या छाटलेल्या फांद्या पडून आहेत. याचा मोठा त्रास खांदा कॉलोनी मधील रहिवासी, वाहनचालक यांना होत आहे. येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.  याची दखल घेत सिडकोने तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या झाडांच्या छाटलेल्या फांद्या उचलल्या आहेत.
खांदा वसाहत परिसरात सिडकोकडून झाडांच्या फांद्या गेल्या 10 दिवसांपूर्वी छाटण्यात आल्या आहेत. परंतु फुथपाथ व रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना फुथपाथवरून त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या फांद्यांवर वाहनचालकांनासुद्धा वाहन चालविताना अडचण होत आहे. या संदर्भात सिडको कार्यालयात कळवूनही रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत. येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. या इशार्‍याची दखल घेत सिडकोने प्रत्यक्षात झाडे उचलण्यास सुरूवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो ः उचलण्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या
Comments