पनवेल मनसे तर्फे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्न-धान्याचे वाटप....

पनवेल / (वार्ताहर) :- पनवेल येथील गरजू  रिक्षा-चालक व गरिब कामगार वर्ग यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरातर्फे आजच्या दिवशी मनसे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५० कुटूंबांना अन्न -धान्याचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मनसे पनवेल विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, पनवेल उपशहर अध्यक्ष संदिप पाटील, प्रकाश लाड, रूपेश शेटे, मंदार पाटणकर, वाहतूक सेना शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक  संजय मुरकुटे , सचिन सिलकर, अनिमेश ओझे, दिपक शहा, अवधूत ठाकूर, गणेश गायकर, आकाश गाडे, अभि रिंगें, अक्षय जोशी, हिमांशु पाटील, आकाश घाटे, आकाश दलाल, विशाल चित्रुक आदि पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments