पनवेल दि. २७ (वार्ताहर): शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व तसेच युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आज खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून स्वप्नपूर्ती सोसायटी खारघर सेक्टर-३६ येथील शेकडो पुरुषांनी व महिलांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
साधारण 3 हजार लोकवस्ती असलेला हा परिसर असून येथील शेकडो जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामूळे शिवसेनेची ताकद या भागात चांगलीच वाढली आहे. त्याप्रसंगी शिवसेना पक्षाबद्दल शिरीष घरत यांनी योग्य मार्गदर्शन करून तसेच नियुक्ती पत्र देवून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, पनवेल महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील, पनवेल खारघर शहरप्रमुख शंकर ठाकुर, शिवसेना नगरसेवक न.मुं.म.पा. सोमनाथ वास्कर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.