कोकणकट्टा कडून साई आधार आश्रमास साडेतीन टन धान्याची मदत.....
पनवेल वृत्तसेवा :- विलेपार्ले येथील कोकण कट्टा ह्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भाताणे येथिल साई आधार ह्या आश्रमास भिक्षा फेरीतून मिळालेले साडेतीन टन धान्य मदत स्वरूपात देण्यात आले यावेळी साई आधारच्या मुलांसोबत जन्मदिनाच्या निमित्ताने केक कापत शालेय व नित्य आवश्यक साहित्य तसेच खाऊ वाटप करून कोकण कट्टाचे जेष्ठ कार्यकर्ते दादा गावडेंच्या मार्गदर्शनाने डहाणू येथील वंकास ग्रामपंचायतीमधील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य तांदूळ वाटप करण्यात आले वनकास येथील कार्यक्रमाच्या सुरवातीला अजित पितळे यांनी उपस्थितांना कोकण कट्टाची ओळख करून दिली.यावेळी दादा गावडे, सुजित कदम, सुनील वनकुंद्रे, हर्षल धरांधर, सुरेश मंचेकर दया मांडवकर, समीर ठाकूर, मनोज शेलार, प्रमोद धुरी, जयवंत जोशी, प्रभाकर सांडम उपस्थित होते. साई आधारचे विशाल परुळेकरं यांनी सहकार्यासाठी कोकणकट्टाचे आभार मानले.