सतिश पाटील यांचे पार्थ पवारांकडून अभिष्टचिंतन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा....

पनवेल/ प्रतिनिधी:-  पनवेलच्या राजकारणात वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांचा नामोल्लेख केला जातो. नगरसेवक म्हणून अत्यंत चांगले काम करणारे पाटील हे तटकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचे पवार कुटुंबीयांशीही चांगले संबंध असल्याचे शुक्रवारी दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी थेट कळंबोली मध्ये येऊन सतिश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे अभिष्टचिंतन करून आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून सतिश पाटील यांची ओळख आहे. तटकरे आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणाऱ्या पाटील यांच्यावर पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. गेल्या चार वर्षापासून ते सक्षम पणे या भागात नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात मध्ये पक्ष संघटना मजबूत झाली. कळंबोली कामोठे आणि इतर  परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा निर्माण झाला आहे. पक्ष संघटना बांधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून पार्थ अजित पवार यांनी निवडणूक लढवली. त्या कालावधीमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सतिश पाटील यांनी आघाडीवर राहुन पार्थ पवार यांचा प्रचार केला. पायाला भिंगरी लावून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. पनवेल ,पार्थ पवार,राष्ट्रवादी आणि जिल्हाध्यक्ष सतिश पाटील अशाप्रकारचे समीकरण निर्माण झाले. निवडणूक काळामध्ये पार्थ यांचे पाटील यांच्याकडे सातत्याने येणे-जाणे होते. त्याचबरोबर त्यांचे पुत्र युवा नेते तुषार पाटील काय पार्थ  पवार यांच्याबरोबर सावलीसारखे राहिले. 
एकंदरीतच पाटील कुटुंबीयांचे या निमित्ताने छोट्या पवारांशी अत्यंत जवळीकता निर्माण झाली. त्यातच या भागातील पक्षाचे  सर्वाधिक ताकतवान नेतृत्व म्हणून सतिश पाटील यांच्याकडे पाहिले जाते. नगरसेवक म्हणूनही त्यांची कामगिरीही उजवी आहे. पालकमंत्री आदिती तटकरे सुद्धा पाटील यांचा आदर करतात. त्यांच्या शब्दाला विशेष महत्त्व आणि वजन असल्याचे अनेकदा दिसून आले. दरम्यान शुक्रवारी 4 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला नाही. दरम्यान याच दिवशी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र थेट कळंबोलीत आले. त्यांनी पाटील यांची शामल मोहन पाटील शैक्षणिक संकुलामध्ये भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सतिश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना त्यामुळे सुखद धक्का बसला. अभिष्टचिंतन करुन पवार पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

चौकट
आमदार निलेश लंके यांच्या कडून फोन द्वारे शुभेच्छाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर नगरचे आमदार आणि पनवेलचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांचे संबंध सर्वश्रुत आहेत.आ.लंके आपल्या सर्व व्यापातून वेळ काढून सतिश पाटील यांना शुक्रवारी फोन केला. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचबरोबर निलेश लंके प्रतिष्ठान चे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे सहकारी दत्ता आवारी, आमदार शशिकांत शिंदे, युवा नेते तेजस शिंदे, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, माजी आमदार विवेक पाटील, शेकाप  वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सतिश पाटील यांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Comments