लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सय्यद अकबर यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
पनवेल / प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई निवडणूक प्रभारी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नधान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली. त्याच बरोबर या कार्यक्रमा दरम्यान 
"देणाऱ्याने देत जावे, 
घेणाऱ्याने घेत जावे, 
घेता, घेता एक दिवस, 
देणाऱ्याचे हात घ्यावे..!"
या "विंदां"च्या कवितेतून दानशूर रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचे गुणगान करत घेणाऱ्यांना त्यांची दानशूर वृत्ती मिळावी अशी मनोकामनाही व्यक्त केली.
सय्यद अकबर यांच्या पनवेल नगर पालिका मार्केट यार्ड मधील "कोकण डायरी"च्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  त्या निमित्ताने भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी तसेच भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी एजाज देशमुख ह्यांनी अल्पसंख्याक मोर्च्या च्या वतीने रामशेठ ठाकूर यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पनवेल येथील पालिका कामगार , पत्रकार , मुस्लिम समाजातील गरजूंनी  उपस्थिती लावली. यावेळी गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यात तांदूळ, तेल , कडधान्य ,पिठ ,साखर आदीचा समावेश होता. 

या कार्यक्रमाला पंतप्रधान जन कल्याणकारी योजना महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभारी साबीर शेख, जेष्ठ पत्रकार दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू , सामान्य नागरिकचे उपसंपादक आसीम शेख , रायगड संदेशचे संपादक विशाल सावंत , कोकण डायरीचे नवी मुंबई प्रतिनिधी इरफान शेख,उद्योजक अमजद खान, भावेश तळेकर, मंगल तळेकर, सामाजिक कार्यकर्ता इरफान तांबोळी , विकास  होंकल्स ,रवी मायदे इतर कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

चौकट 
*देव हा आमचा..*
रायगडकरांना सदैव संकटात न्याय देणाऱ्या आमच्या ‘ रामाला ‘ ...देव, आरोग्य, समृद्धी, ऐश्वर्य ,  दीर्घायुष्य देवो अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करताना सय्यद अकबर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. 
देव आम्ही म्हणावे कोणाला?…दगडाला की त्या स्वर्णमूर्तीला…
नेमका कसा, पाहिले का तुम्ही त्याला
भेटला आहे का  कधी तो तुम्हाला…?देव दगडात असे की मूर्तीत वसे… आहे का माहीत, रूप तयाचे कसे?…असता मनी खरी भक्तीभावना 
करावी माणुसकीची आराधना 
जिंका माणुसकीला,… 
देव माना मानवतेला, 
देव माना मानवतेला..!
शंभरातून एखादाच शूरवीर जन्मतो,
हजारातून एखादाच विद्वान ,  वक्ता दहा हजारातून एखादा जन्मतो. परंतु दातृत्वाची संवेदना सतत जागृत असणारा कर्णा सारखा दाता हा क्वचितच जन्मतो. असाच एक दाता, एक दानशूर व्यक्तीमत्व रायगड जिल्ह्याचे भाग्य म्हणूनच आपल्याला लाभलय... ते व्यक्तीमत्व म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर....त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा... अशा शब्दात मनोगत व्यक्त करत सय्यद अकबर यांनी कार्यक्रमात बहार आणली.
Comments