शाळा चालू नसताना अन्य उपक्रमांच्या फी ला पालकांचा तीव्र विरोध....पनवेल, दि. २६ (वार्ताहर) ः कोरोना महामारीत शाळा बंद असताना आँनलाईन शिक्षण चालू असताना सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापनाकडून आँनलाईन ट्युशन फी बरोबर अन्य उपक्रमाची फी आकारण्यात आली आहे. ती वसुलीसाठी पालकांना तगदा लावताना आँनलाईन लिंक बंद करण्यात आली आहे. शिक्षणाचा अधिकार हिरावून घेत येत नाही या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविणा-या सेंट जोसेफ शाळा कळंबोली व्यवस्थापना विरोधात आज ( दि 26 ) रोजी संतप्त पालक वर्गानी धडक दिली. 

कोरोना महामारीत उद्योगधंदे, व्यवसाय बंद होवून अनेकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. जागतिक वैश्‍विक संकट असून आर्थिक संकटाचा सामना करावा लगत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थेनी फी वाढ करू नये, तसेच पालकांनी त्यांना शक्य होईल तशी टप्प्याटप्प्याने फी भरावी, असे शासनाकडून आदेश आहेत. कुटूंब चालविणेच मुश्किल असताना फी कशी भरणारची या बिकट परिस्थितीत असलेल्या पालकांच्या मुलांचे पनवेल तालुक्यातील अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद करून त्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवले आहे. अनेक शाळा पालकांच्या विनंतीला न जुमानता अरेरावी पणे 100 टक्के फी ची मागणी करीत आहेत. जी मागणी महामारीच्या काळात अवास्तव आणि दुर्दैवी आहे. त्यांनी कित्येक मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे आणि भारतीय संविधानाच्या शिक्षणाच्या अधिकाराचा अपमान केलेला आहे. अश्या शाळांनी त्वरित मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करावे आणि फीचा तगादा न लावता अवाजवी फी वसुली करू नये या करिता पालक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आज सेट जोसेफ कळंबोली येथे पालकांनी नगरसेवक बबन मुकादम यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली.

सेंट जोसेफ शाळा कळंबोली विरोधात नगरसेवक बबन मुकादम यांच्या नेतृत्वाखाली आज पालकांनी सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापनाची भेट घेवून बंद केलेली आँनलाईन लिंक चालू करण्याची मागणी करून आँनलाईन ट्युशन फी भरण्याची तयारी दाखवली. वर्षभर शाळा चालूच नाही तर लँब फी, कँम्पुटर फी, अँक्टीव्हिटी फी, अन्य उपक्रमांची फी, लाईट बील, पाणी बील आम्हा पालकांच्या माथी का?न्यायालयाने शाळा बंद असताना ट्युशन फि व्यतिरिक्त अन्य उपक्रमांची फी आकारावी असा कोणताही निर्णय दिलेला नाही आणि दिला आहे तर तो त्या शाळानी दाखवावा.
असा सवाल करत अन्य उपक्रमाांच्या आकारलेल्या फी कमी करण्ययात आली नाही तर तर तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा पालकांच्या वतीने नगरसेवक मुकादम यांनी शाळा व्यवस्थापनाला दिला. तुमच्या मागणीचा विचार करता तुमचे निवेदन मुख्य कार्यालयात पाठविण्यात आले आहे असे मुख्याध्यापिका यांच्याकडून सांगण्यात आले. 

पनवेल परिसरात करोना संसर्ग सुरू असतांना, शैक्षणिक वर्षे कधी सुरू होईल याची खात्री नसतांना काही शाळांच्या व्यवस्थापनाकडून पालकांकडून आगामी शैक्षणिक वर्षासाठी ‘फी’ चा तगादा लावण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नव्याने ‘फी’ वाढ प्रस्तावित आहे. अशा सर्व शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार येताच चौकशी करून करवाईचे आदेश पनवेलचे गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील पनवेल परिसरातील खाजगी शाळा मुख्याध्यापक यांना पत्र काढले आहेत. या निवेदनाला काही शाळानी केराची टोपली दाखविली असून आँनलाईन लिंक बंद करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे अन्य उपक्रमाांच्या आकारलेल्या फी विरोधात सेंट जोसेफ शाळी कळंबोलीवर पालकांनी धडक दिली. शाळा व्यवस्थापनानी दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांच्या वतीने नगरसेवक बबन मुकादम यांनी दिला.
Comments