दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू.......
दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू.....

पनवेल दि.२० (संजय कदम): पनवेल परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा जणांचा मृत्यु झाला आहे.
         पनवेल जवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर किमी 12.600 भाताणच्या हद्दीत पायी जात असलेल्या एकाला अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून सदर इसमाला धडक देऊन त्यात तो इसम गंभीररित्या जखमी होऊन मृत्यु पावला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 
तर दुसऱ्या घटनेत तळोजा से.-2 मधील पंचशील सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा रफिक गफूर अली (वय-26) हे सोसायटीत पाणी पंप सुरू करत असताना त्याला वीजेचा शॉक लागून त्याचा मृत्यु झाला आहे. या  घटनेची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image