मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची पनवेलमध्ये लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी...

पनवेल / वार्ताहर :- सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेतील पुढचा टप्पा म्हणजे १८-४४ वयोगटातील युवांचे लसीकरण,या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी हा विषय घेऊन पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर तथा भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेतली व या विषयावर विस्तृत चर्चा केली. यापुर्वी सुद्धा पत्र देऊन ही मागणी विक्रांत पाटील यांनी केली होती, परंतु आता या विषयी तरतूद करून प्रत्यक्ष जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चे दरम्यान  त्यांनी केली.
Comments