केएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन...
पनवेल दि. २० (वार्ताहर): सध्याच्या कोरोनाच्या काळात रूग्णांना रक्ताची खरी गरज आहे. तरी तरूण वर्गाने देशासाठी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहनकेएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा कोमल खोचरे (तावरे) यांनी रक्तदान करताना केले आहे.
           सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा कोमल खोचरे (तावरे) या विविध उपक्रम गेल्या वर्षभरात राबवित आल्या आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात संस्थेमार्फत कऱण्यात आले आहे. आज राज्याला मोठ्या प्रमाणात रक्त दात्यांची गरज आहे. हि गरज ओळखून तरूण वर्गाने, विविध सामाजिक संघटना व संस्थांनी देश हितासाठी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन स्वतः रक्तदान करून कोमल खोचरे (तावरे) यांनीकेले आहे.          


फोटोः केएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा कोमल खोचरे (तावरे) रक्तदान करताना
Comments