तळोजा कारागृहातील ३४६ कैद्यांचे लसीकरण...


पनवेल, दि.१९ (वार्ताहर) :-  पनवेल महापालिका आरोग्य विभागाकडून तळोजा कारागृहातील ४५ वर्षावरील ३४६ कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
तळोजा कारागृहातील नवीन कैद्यांपासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नकीन कैद्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तर नवीन आलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे, एखाद्या कैद्यामध्ये वेगळी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून संबंधित कैद्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तळोजा कारागृह अधीक्षक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष लक्ष दिले आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या कैद्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन द्यावे, असे पत्र तळोजा कारागृह प्रशासनाने पनवेल महापालिका आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने नुकतेच तळोजा कारागृहातील 45 वर्षांवरील 346 कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
Comments