आर.डी.सी बँक कळंबोली शाखेचा वर्धापन दिन साजरा ; बचत गटाला कर्ज वितरण व खातेदारांना मास्क वाटप.....

कळंबोली (दीपक घोसाळकर ) : राज्यात सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य व नामांकित असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंबोली शाखेचा आठवा वर्धापन दिन छोटेखानी समारंभात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाखेच्यावतीने महिला बचत गटांना कर्ज वितरणाचे चेक व खातेदारांना मास्क चे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थित खातेदारांनी बँकेची आर्थिक उन्नती होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
          
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कळंबोली शाखा सुधागड विद्यासंकुलाच्या  स्थळी आठ वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती. गेल्या आठ वर्षात बँकेच्या शाखेशी हजारो खातेदार ,महिला बचत गट जोडले गेले आहेत. आज सोशल डिस्टन्सचे पालन करून कळंबोली शाखेच्या शाखाधिकारी सोनल कमाने यांनी शाखेचा वर्धापन दिन निमित्त शाखेत लोकप्रतिनिधी, खातेदार, महिला बचत गटांचे प्रमुखांना बोलून छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शेकाप नेते व पनवेल महापालिकेतील नगरसेवक गोपाळ भगत यांच्या हस्ते केक कापून बँकेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शेकापचे नेते महादेव बुकम , शाखाधिकारी सोनल कमाने , पनवेल शाखेचे शाखाधिकारी नितीन जाधव, बँकेचे रोखपाल नितेश तोंडसे ,  बचत गट सहायिका सोनल इंगवले ,तसेच कर्मचारी प्रियंका पावसकर डीम्पल वाघमोडे, संकेत शेळके, पत्रकार सुनील कोळी, दिपक घोसाळकर व खातेदार या वेळी उपस्थित होते. वर्धापन दिनी बँके विषयी माहिती देताना नितेश तोंडसे यांनी सांगितले की सद्यस्थितीत शाखेची आर्थिक उन्नती चांगली झाली असून जवळपास १४  कोटीच्या ठेवी बँकेने जमवल्या असून ३४ कोटी पर्यंत कर्ज वितरण केले आहे .बँकेची भरभराट गेल्या आठ वर्षात समाधान कारक आहे. बँकेच्या माध्यमातून व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने महिला बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन पर विविध छोट्या छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण देण्याची योजना बँकेने आयोजिले आहे. त्यासाठी विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासही कळंबोली शाखेने प्रारंभ केला आहे. या योजनेस महिला बचत गटाकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शाखाधिकारी सोनल कमाने यांनी यावेळी सांगितले.
Comments