शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल....

पनवेल : सर्वोदय कृषी सेवा केंद्राच्या नावाने भात बियाणे श्रीमंत सीड्स या उत्पादकाच्या भात बियाणेच्या पिशवीत टाकून ते सीलबंद करून एका विशिष्ट कंपनीच्या नावाने विक्री करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवला होता. त्यामुळे परवानाधारक समीर वनगे आणि वैशाली वनवे यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      
जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विजय तुपे सौंदर्य हे छापा टाकून तपासणी करतात. पनवेल येथील कृषी सेवा केंद्र तपासणीसाठी सर्वोदय कृषी सेवा केंद्र, मार्केट यार्ड, पनवेल यांच्या गोदामात त्यांना श्रीमंत सीडस या उत्पादन कंपनीच्या भात बियाणे छापील रिकाम्या पिशव्या दोन हजार पाचशे मिळून आल्या. यासोबत 530 किलो सुटे भात बियाणे मिळून आले. यावेळी समीर वनगे आणि वैशाली वनवे यांनी परवाना सादर केला या परवान्यात श्रीमंत सीड्स या उत्पादक कंपनीचा समावेश असल्याचे दिसून आले. त्यामुळे श्रीमंत सीड्स या उत्पादकाच्या भात बियाणेच्या पिशवीत टाकून ते विशिष्ट कंपनीच्या नावे विक्री करून शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने वनगे आणि वनवे यांनी साठा करून ठेवला. 
Comments