पनवेल / वार्ताहर :- मॉर्निंग वॉकसाठी पायी चालत जात असलेल्या 47 वर्षे इसमाच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरट्यांनी खेचून नेली आहे. याप्रकरणी खारघर पोलिस अधिक तपास करत आहेत.
खारघर, सेक्टर 17 येथील धनराज मारुती माने सिडको मध्ये काम करतात. ते घरातून मॉर्निंग वॉकसाठी चालत सेक्टर 26, खारघर येथे गेले असता त्यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली. त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरीने खेचली व तो दुचाकी चालक पळून गेला.