पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष्मी वसाहतीमध्ये औषध फवारणी...

पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणून एस.टी.स्टॅण्ड परिसरात असलेल्या लक्ष्मी वसाहतीसह इतर झोपडपट्टीमध्ये औषध फवारणी घराघरात जावून करण्यात आली.
महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संकट असजून टळले नाही आहे. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवकांच्या माध्यमातून लक्ष्मीवसाहती मध्ये फवारणी करण्यात आली. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, कार्यकर्ते चंद्रकांत मंजुळे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
Comments