मोबाईल फोन खेचून पळणारा पोलिसांच्या ताब्यात.....


पनवेल दि.18 (वार्ताहर): पतीसह रस्त्याने पायी चालत जाणार्‍या विवाहितेच्या हातातील मोबाईल खेचुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेले दोघे तरुण मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडल्याने सदर दाम्पत्याने एका अल्पवयीन तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खांदा वसाहत भागात घडली. खांदेश्वर पोलिसांनी या अल्पवयीन तरुणावर व त्याच्या
साथिदारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच पळुन गेलेल्या त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे.         या घटनेतील तक्रारदार अमोल कोरे (31) हा खांदा वसाहत सेक्टर-12 मध्ये राहाण्यास असून जेवण केल्यानंतर तो आपल्या पत्नीसह शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडला होता. यावेळी कोरे याची पत्नी चालत जातानाच मोबाईलवर बोलत होती. 
यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने कोरे याच्या पत्नीच्या हातातील मोबाईल फोन खेचला. त्यानंतर दोघेही भरधाव वेगात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची मोटारसायकल स्लिप होऊन दोघेही मोटारसायकलसह खाली पडले. यावेळी मोबाईल खेचणारा तरुण संधी साधून पळून गेला, मात्र मोटारसायकल चालविणार्‍या अल्पवयीन तरुण कोरे दाम्पत्याच्या हाती लागला. त्यामुळे कोरे दाम्पत्याने त्याला पकडून खांदेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पोलिसांनी सदर अल्पवयीन तरुणाला जबरी चोरीच्या गुह्याखाली ताब्यात घेऊन पळुन गेलेल्या त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे. या अल्पवयीन तरुणाला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बालाजी पावणे यांनी दिली. या घटनेत अल्पवयीन तरुण कळंबोली भागात राहण्यास असुन सध्या तो बारावीचे शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या शेजार्‍यांची मोटारसायकल चालविण्यासाठी घेऊन हा गुन्हा केल्याचे तपासात आढळुन आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image