अभिनेत्री नयन पवार यांनी केले शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्नधान्याचे वाटप...

मुंबईत, दि. १८ -  गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. राज्यातील नाट्य, चित्रपटगृह बंद असल्याने बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावसर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 

सरकारकडून वेळेवर मदत मिळत नाही. अश्या वेळेस त्यांनी काय करावे. संपूर्ण नाटय व्यवसायावर अवलंबून असलेले हे नाट्यकर्मी, त्यांनी आपले कुटुंब कसे राखायचे, जगवायचे. नाटकाचा प्रयोग असला तरच त्यांना पैसे मिळतात. नाटयनिर्माता, संस्था, कलावंत काही दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र काही महिने वगळता लॉक डाऊन सातत्याने चालू आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून लॉकडाऊन असल्याने नाट्य, चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यावतीने शिवाजी मंदिर या नाट्यगृहातील बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 

 यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, दिलीप दळवी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image