पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची विक्रमी खरेदी; पेरणी झाली तरीसुद्धा शेतकरी अजूनही बोनसच्या प्रतीक्षेत.....

पनवेल दि.३० (वार्ताहर)- पनवेल तालुका सहकारी भात गिरणी च्या वतीने सन २०२०-२०२१ च्या हंगामात विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. भात खरेदीच्या बाबतीत पनवेलचे केंद्र रायगड जिल्ह्यातील सर्वात अव्वल केंद्र ठरले आहे. तर तालुकास्तरावर पेंबतालुका अव्वल ठरला आहे. सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हमी भावाची रक्कम थेट खात्यावर जमा झाली असली तरीसुद्धा बोनसची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही.
      याबाबत आमच्या प्रतिनिधीने पनवेल तालुका सहकारी भात गिरणीचे चेअरमन मनोहर पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की,२०२०-२०२१ च्या हंगामात विक्रमी खरेदी करण्यात आली असून सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हमीभावाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.यंदाच्या हंगामात एकूण २१,६८६ क्विंटल खरेदी झालेली असून १४४८ शेतकऱ्यांना त्याचे पैसे अदा केले आहेत.या हंगामासाठी शासनाच्या वतीने १८६७/- रू प्रती क्विंटल भाव दिलेला आहे. ते पुढे म्हणाले की असे असले तरी देखील प्रतिक्विंटल ७०० रुपये देण्यात येणारा बोनस अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पुढच्या हंगामाची पेरणी संपत आली असून आता लावण्यांना सुरुवात झाली आहे तरीदेखील बोनसचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मनोहर पाटील पुढे म्हणाले की, विक्रमी स्वरूपाची भात खरेदी झाल्यानंतर आमचे गोदाम कमी पडू लागले त्यामुळे आम्ही सहकारी भात गिरणी च्या प्रांगणात भाताच्या गोणी रचून ठेवल्या होत्या. परंतु मागील हंगामात दोन वेळा जोरदार स्वरूपाच्या अवेळी पावसाने आमच्यासमोर आव्हान उभे ठाकले होते. पनवेल तालुका सहकारी भात गिरणीचे तमाम संचालक आणि कर्मचारी वृंद यांच्या अथक परिश्रमामुळे आम्ही वेळीच रचलेल्या भात पोत्यांना ताडपत्री चे आवरण टाकल्यामुळे किलोभर भात देखील आम्ही सडू दिला नाही.


चौकट
एकीकडे हमी भावामुळे शेतकरी पुन्हा एकदा शेती व्यवसायाकडे वळत असताना शासनाने अशा प्रकारे बोनस देण्यात उशीर करणे उचित होणार नाही. शासकीय हमीभाव योजना तळागाळापर्यंत राबविली गेली असली तरी देखील तिचा लाभ जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा शासनाप्रति विश्वास निर्माण होणार नाही. त्यामुळे माझी शासनाला अशी विनंती असेल की शेतकऱ्यांचे बोनस चे पैसे तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत.

मनोहर पाटील.

Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image