पनवेल गुन्हे शाखेकडून 14 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस ; सराईत गुन्हेगार गजाआड.....

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः मागील सहा महिन्यापासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ला यश आले आहे.
पोलीस आयुक्त नवीमुंबई बी.के.सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्या मध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व अभिलेखा वरील जामिनावर सुटलेले गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने सहा.पो. आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेली वाहने, गुन्हा घडलेली वेळ व वार यांची माहिती संकलित करून तांत्रिक तपासा वरून ठाणे पोलिस आयुक्तालय अभिलेखा वरील सोनसाखळी चोरी मधील गुन्हेगार नामे फजल आयुब कुरेशी वय 25 वर्ष रा.ठी. रूम नंबर 4, टाटा पावर समोर, पठाण चाळ सूचक नाका कल्याण हा निष्पन्न झाला. सदर आरोपी हा त्याचेकडील चालु मोबाईल हा दिवसातुन काही वेळासाठी फक्त 4 ते 5 मिनिटासाठी चालु करीत असल्याने. सदर आरोपीस ताब्यात घेणेकामी मुंब्रा, भिवंडी, कल्याण, वर्तकनगर ठाणे येथे सपोनि प्रवीण फडतरे,गणेश कराड,पो उप निरी.मानसिंग पाटील,वैभव रोंगे यांची वेगवेगळी पथके पाठवुन सदर ठिकाणी सलग  04 दिवस सापाळा लावुन नमुद आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता नमूद आरोपीकडून खालील सोनसाखळी चोरीचे एकूण 12 गुन्ह्यासह 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये पनवेल शहर, कळंबोली, खारघर, एपीएमसी, ठाणे, नारपोली, कोन गाव, मानपाडा, भिवंडी, डोंबिवली, वागळे इस्टेट, टोकावडे, कोळसेवाडी आदी भागातील उघडकीस आल्या आहेत. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी सफौ.एस.पाटील, एस.साळुंके, पो.हवा.पाटील, पाटकर, गडगे, पवार, कुदळे, पो.ना.पाटील, कानू, मोरे, फंदे, पो.शि.पाटील यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
नमूद आरोपी कडून गुन्हयातील जबरी चोरी केलेले दागिने व गुन्ह्यात वापरेलेल्या दोन स्कुटी मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरचा आरोपी हा 24 एप्रिल 2021 रोजी कोरोना विषाणा प्रादुर्भाव रोखणेकामी मा. न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर आधारवाडी कारागृह ठाणे येथुन बाहेर आल्यावर त्याने सलग एवढे गुन्हे केले आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी ही गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी 16सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते सहा महिन्यात गुन्हे शाखा कक्ष 2पनवेल यांनी सहा महिन्यात 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.


फोटो ः सराईत सोनसाखळी चोराला अटक करताना पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे अधिकारी
Comments