पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर यांचा वाढदिवस साजरा

पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांचा वाढदिवस नुकताच(रविवार दि. १६ मे) संपन्न झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता  पनवेल तालुका पत्रकार महासंघाने आयोजित केलेले अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी सांगितले, ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच लवकरच सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
            
प्रमोद वालेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक रायगड नगरीचे मुख्य संपादक सुनील पोतदार, महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, खजिनदार तथा आर्याप्रहरचे  संपादक सुधीर पाटील, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, दैनिक रायगड नगरीचे प्रतिनिधी प्रदिप वालेकर, दैनिक कृषिवलचे प्रतिनिधी राजेश डांगळे, रायगड शिव सम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments