लाईफलाईन हॉस्पिटल परिसरातून मोटार सायकलची चोरी....


पनवेल, दि.१३ (संजय कदम) ः पनवेल शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातून एका मोटार सायकलची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत.
रणजित बर्‍हाटे (45) यांची 20 हजार रुपये किंमतीची एमएच-46-2604 राखाडी रंगाची यामहा ही लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरात उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेल्याने याबाबची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments