मे.अलवेज अ‍ॅडव्हरटायझिंगच्या विरोधात गुन्हा दाखल
पनवेल, दि. २१ (संजय कदम) ः तौक्ते चक्री वादळामध्ये जाहिरातीचे फलक मुळ स्ट्रक्चरसह खाली पडून त्या खाली झोपड्या दबल्याने तसेच एक रिक्षा व मोटार सायकल दबल्याने झालेल्या नुकसानीपोटी पनवेल शहर पोलिसांनी मे.अलवेज अ‍ॅडव्हरटायझिंगच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
17/5/2021 रोजी 17.30 सुमारास जोरदार वाहणार्‍या वार्‍यामुळे गांधी हॉस्पिटल समोरील इंदिरा नगर येथे आयटीआय जवळ असलेल्या सदर जाहिरातीच्या कंपनीच्या होल्डींगची देखभाल व दुरुस्ती न करता मानवी जिवीत व इतरांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल असे हयगयीने कृत्य केल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले व सदर स्ट्रक्चर मुळासकट नटबोल्ड तुटून बाजूला असलेल्या झोपड्या व वाहनांवर पडून त्यांचे नुकसान केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी परवेज एन.खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर वेळी नगरसेवक राजू सोनी यांनी सर्तकता दाखवून यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी कडू, पनवेल शहर पोलीस, अग्नीशमन दल यांना तातडीने संपर्क साधून या घटनेची माहिती दिली होती. महानगरपालिकेचे अधिकारी कडू व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी त्वरित पोहचून परिसरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना बाहेर काढल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे. 


फोटो ः पडलेले होल्डींग
Comments