कामोठे पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी ; गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल, दि.८ (संजय कदम) ः सध्याच्या कोरोना काळाच्या पार्श्‍वभूमीवर हातावर पोट असलेल्या गरीबांसाठी मदतीचा हात म्हणून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार कामोठे पोलीस ठाण्याच्या वपोनि स्मिता जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी परिसरातील गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
अनेकांना सध्याच्या लॉकडाऊनमुळे घरीच रहावे लागत आहे. कामधंदा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. ही गोष्ट कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी कामोठे परिसरातील गरीब व गरजू निराधार लोकांना 70 ते 80 कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले.


फोटो ः वपोनि स्मिता जाधव अन्नधान्याचे वाटप करताना.
Comments