जास्त ट्रीप मारल्याचा राग धरुन तीघांनी केली एका इसमास मारहाण


पनवेल, दि. १५ (संजय कदम) ः तुझ्याच का जास्त ट्रीप होतात, तुझ्यामुळे आमच्या ट्रीप कमी होतात असे बोलून एका चालकाला त्याच्या तिघा सहकार्‍यांनी नाहक शिवीगाळ करून वाद करून त्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना सोेमटणे गावाच्या हद्दीत घडली आहे.
या ठिकाणी असलेल्या नवकार कॉर्पोरेशन लि.कंपनीच्या आवारात शहाजी हटकर (45) हे कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात. यावेळी हे त्यांच्या गाडीत आराम करीत असताना आरोपी लिंगप्पा सरगर, रोहित सरगर व एक अनोळखी इसम ते त्या ठिकाणी येवून तुझ्याच का जास्त ट्रीप होतात, तुझ्यामुळे आमच्या ट्रीप कमी होतात असे बोलून त्यानंतर शहाजी हटकर चहा पिण्यासाठी कंपनीच्या गेटकडे निघाले असताना या तिघाांनी आपसात संगनमत करून त्यांच्या पाठीमागे पळत जावून त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना दुखापत केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments