पनवेल, दि.६ (वार्ताहर) :- व्हिसाची मुदत संपलेली असतानाही भारतात राहण्याचा कोणताही अनधिकृत परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणार्या महिलेविरुद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
मीस.ब्युटी खातून, सध्या रा.तळोजा फेज-2, या बांगलादेशी महिला असून तळोजा पोलीस ठाणे हद्दीत तळोजा फेज-2 येथे त्यांची व्हिसा मुदत संपल्यानंतरही भारतात राहण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 14 (ए), 14 (बी), पासपोर्ट कायदा 1967 चे कलम 12 (सी) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.